सर्वसमर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो.
TSK
TSK · 2 शमु 19:39
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.
याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला.
¶ मग तिच्या सुना मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले, पण रूथ तिच्या जवळ राहिली.
होमार्पणे व शांत्यर्पणे केल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद दिले.
तेव्हा राजा दावीद त्यास म्हणाला, मुला आम्ही सर्व जण येणे काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल. अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. परंतु दावीद गेला नाही. पण त्याने आपले आशीर्वाद दिले.
अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्यास म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे.” मग मी तुझ्याबरोबर येतो. एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा पण मी तुला काय केले ते लक्षात ठेव.”
तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले.