TSK

TSK · 2 शमु 21:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तर परमेश्वराने त्यादिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्यादिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.”

आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.

उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.

परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.”

¶ पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.