TSK

TSK · 2 शमु 22:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मग येशूवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन सदासर्वकाळ करा. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत आणि तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.

या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.

तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.

मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.

त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.

परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल? किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील?

नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”

मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.

‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’

देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले. जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.