TSK

TSK · 2 शमु 7:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही?

शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.”

तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो मनुष्य आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले.

¶ “तर आता, माझा सेवक दावीद याला सांग की, ‘सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे” की, तू माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला गायरानातून, मेंढरांच्या मागून काढून घेतले.

मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले, आणि मला म्हटले, ‘जा, माझ्या लोकांस, इस्राएलाला, भविष्य सांग.’