TSK

TSK · 2 शमु 8:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा

जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.

आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने घेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय त्यांनी, माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबाचे बारा हजार सैनिक घेतले.

हद्देजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलाशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अराम्यांनी धास्ती घेतली.

नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.

दाविदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर, रजोनाने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला.

पुढे शलमोनाने, हमाथ-सोबा हे नगर जिंकून घेतले.

समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.