TSK

TSK · प्रेषि 11:20

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरनेकर नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्यास धरून त्याचा वधस्तंभ वाहायला लावले.

फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी,

आणि दररोज, परमेश्वराच्या भवनात व घरोघर शिकवण्याचे, व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.

फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले.

यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला, येशू हा देवाचा पुत्र आहे.

¶ अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल.

परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे.

जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,