TSK

TSK · प्रेषि 11:30

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ बर्णबा व शौलाने त्यांचे यरूशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले, त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.

तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर लोकांनी या वादाविषयी यरूशलेम शहरामधील प्रेषित व वडील ह्यांच्याकडे जावे.

¶ मग प्रेषित व वडीलवर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले.

¶ तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरूशलेम शहरातील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले.

दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला, तेव्हा सर्व वडीलजन हजर होते.

कारण तीताने आमच्या आव्हानाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे.

दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय सेवकावरील आरोप दाखल करू नकोस.

तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे

¶ वडिलांकडून देवाने निवडलेली स्त्री कुरिया व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुद्धा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील.