TSK

TSK · प्रेषि 19:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

शमुवेलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता, आणि परमेश्वराचा संदेश अजून त्यास प्रगट झालेला नव्हता.

देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.

पेत्र व योहान जेव्हा आले, तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून, प्रार्थना केली.

त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.

कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे;

¶ बंधूनो आत्मिक दानांविषयी, तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.