TSK

TSK · प्रेषि 20:24

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिंमतीने वाट काढली, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दावीदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वरास अर्पण केले.

‹आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहात म्हणून तुम्हीही साक्ष द्याल.”›

तो आपल्या मधलाच एक होता आणि त्यास या सेवेतल्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता.”

बर्णबा चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता, जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे, त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला, अंत्युखियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.

पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली.

पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.”

‹या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.›

आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते.

ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय?

कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे.

म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.

आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही.

¶ म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.

उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;

आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.

त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली.

म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे.

¶ तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;

¶ तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळी आहे.

तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात.

अंत्युखिया, इकुन्या आणि लुस्र या शहरांमध्ये ज्या गोष्टी माझ्याबाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे, परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.

प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.

¶ कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.

तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली

¶ म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.

ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.