जो समर्थ देव परमेश्वर! जो समर्थ देव परमेश्वर! तो जाणतो; आणि इस्राएल, तोसुद्धा जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वराविरुद्ध उल्लंघन असल्यास तू आज आम्हांला वाचवू नकोस;
TSK
TSK · प्रेषि 25:11
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ दावीद आपल्या मनात म्हणाला, “कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन; तर पलिष्ट्यांच्या मुलखात मी पळून जावे यापेक्षा मला दुसरे काही बरे दिसत नाही; मग शौल इस्राएलाच्या अवघ्या प्रांतात आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल आणि मी त्याच्या हातातून सुटेन.”
मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कोणीही करु शकणार नाही.
परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे.”
मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्यास तुरुंगातच ठेवावे.
अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्यास सोडून देता आले असते.”
त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;