TSK

TSK · प्रेषि 7:51

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर मोशेला म्हणाला, “या लोकांस मी पाहिले आहे; ते ताठ मानेचे लोक आहेत;

कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”

या कारणामुळे, मीही त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील.

परमेश्वर असेही मला म्हणाला, “मी या लोकांस पाहीले आहे. ते फार हट्टी आहेत.

तुमचा देव परमेश्वर तुमच्या हृदयाची सुंता व तुमच्या पुर्वंजांच्या हृदयाची सुंता करील आणि आपण जिवंत रहावे म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपुर्ण जीवाने प्रेम कराल.

आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वरास शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल.

¶ अनेक वर्षे तू त्यांची गय केली. आपल्या आत्म्याने संदेष्ट्याद्वारे तू त्यांना बजावलेस. पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा त्यांना तू शेजारील देशातल्या लोकांच्या हवाली केलेस.

तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.

पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून तो त्यांचा शत्रू झाला आणि त्यांच्याविरुद्ध लढला.

मी कोणाला घोषीत करू आणि चेतावणी देऊ, जेणेकरून ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुंता आहे म्हणून त्यांना ऐकू येत नाही. पाहा, परमेश्वराचे वचन त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या जवळ आले आहे, पण त्यांना ते नको आहे.

पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही. परंतू ते आपल्या मानेत ताठर झाले, म्हणून ते ऐकेणात आणि शिक्षण आत्मसात करेनात.

कारण तुम्ही माझी भाकर, चरबी व रक्त अर्पण करताना जे मनाने व शरीरानेही बेसुंती अश्या परक्या लोकांस माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यात भर टाकली आहे.

¶ पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले व मान ताठ केली, देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले.

पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.

तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?

त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून.

कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.

कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.