TSK

TSK · प्रेषि 8:40

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ आता पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला होता तो त्यांनी एबन-एजराहून अश्दोदास नेला.

¶ यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्याठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.

¶ कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता, तो इटलीक नावाच्या पलटणीत शताधिपती होता.

हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्यास शोधू शकला नाही, मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली, नंतर हेरोद यहूदीया प्रांतातून निघून गेला, तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला.

कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.

कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले.

फेस्ताने उत्तर, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे.

¶ मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.