कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.
TSK
TSK · प्रेषि 9:24
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको!
काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.
त्याठिकाणी तो तीन महिने राहिला, पौल सिरीया प्रांताला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले.
¶ मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.
आणि, कृपाकरून त्यास यरूशलेम शहरात बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.
दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता.