कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामाविरुध्द भडकावले.
TSK
TSK · आमो 1:6
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ-शेमेश, अयालोन, गदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली. व तेथे ते राहायला गेले.
¶ यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले.
¶ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण आपल्या मनात फार जुने शत्रुत्व आणि तिरस्कार बाळगून पलिष्ट्यांनी यहूदावर सूड घेतला आहे आणि तिचा नाश केला आहे.
तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले.
परमेश्वर असे म्हणतो, “सोराच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस अदोम्यांच्या हाती दिले आणि त्यांच्या भावांबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.
ज्या दिवशी तू अलिप्त राहिलास, ज्या दिवशी परक्यांनी त्यांची संपत्ती लुटून नेली, परदेशी त्यांच्या वेशीत शिरून; आणि त्यांनी यरूशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या; आणि त्या दिवशी तूही त्यातला एक होतास.
¶ “अष्कलोन हे पाहील आणि भयभीत होईल! गज्जाचे लोक भीतीने खूप थरथर कापतील, आणि एक्रोन शहराची आशा नष्ट होईल. गाझामधील राजा नाश पावेल व अष्कलोनात यापुढे वस्ती राहणार नाही.