TSK

TSK · आमो 5:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे.

उपवनातील फळ झाडांपासून आनंद व उल्लास नाहीसा झाला आहे; आणि तुमच्या द्राक्षमळ्यात तेथे गायनाचा व आनंदाचा गजर होत नाही. व्यापारी दाबून मद्य काढण्याचे व्यवसाय करणार नाही; द्राक्षांच्या हंगामातील आनंदाचा गजर मी बंद केला आहे.

म्हणून मवाबाच्या फळबागेतून व देशातून उत्सव व हर्ष दूर केलेले आहेत. मी त्यांच्या द्राक्षकुंडातून द्राक्षरस नाहीसा केला आहे. ते हर्षाने ओरडून द्राक्षे तुडविणार नाहीत. कोणतेही ओरडणे हर्षाचे ओरडणे होणार नाही.

मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो. तेव्हा यरूशलेम पवित्र होईल. आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत.

¶ पाहा, जो सुवार्ता आणतो, शांती जाहीर करतो! असा जो त्याचे पाय पर्वतांवर आहेत, यहूदा आपले सण साजरे कर, आपले नवस फेड, दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.