आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली.
TSK
TSK · आमो 5:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्यांच्या पूर्वजांच्या अन्यायामुळे त्यांच्या मुलांसाठी तुम्ही कत्तल करण्याची तयारी करा, म्हणजे ते उठणार नाहीत आणि पृथ्वी ताब्यात घेणार नाहीत व संपूर्ण जग नगरांनी भरणार नाही.
त्याच्याबद्दल परमेश्वर हे शब्द बोलला आहे. सियोनेची कुमारी तुला तुच्छ मानून तिरस्काराने तुला हसते, यरूशलेमेची कन्या, तुला डोके हलवून दाखवते.
ऊठ, ऊठ, यरूशलेमे, जागी हो. तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन घेतला आहे. तू थरकापाच्या प्याल्यांतला गाळ चोखून पिऊन घेतला आहे.
अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.
कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे.
यास्तव परमेश्वर असे म्हणतो: दुसऱ्या राष्ट्रांना विचारा, या अशा गोष्टी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का? इस्राएलाच्या कुमारीने भयंकर असे काम केले आहे.
हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील. तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील.
म्हण ‘बाबेल याप्रमाणे बुडेल. जे अरिष्ट मी तिच्याविरूद्ध पाठवणार आहे त्यामुळे ती कधीही वर येणार नाही आणि ते थकून जातील.” येथे यिर्मयाची वचने संपली.
यरूशलेमकन्ये, मी तुझ्या संबधी काय बोलू? मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी तुलना कोणाबरोबर करू, सीयोनेच्या कुमारी कन्ये? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोण बरे करू शकेल?
दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.
टोळांनी देशातील सर्व गवत खाऊन झाल्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हास क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही, कारण तो फारच लहान आहे.”
त्या दिवशी दाविदचा मंडप जो पडला आहे, मी तो पुन्हा उभारीन. मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झोलेले आहे, ते मी पुन्हा बांधीन. मी त्या पुरातन दिवसात होत्या, तशाच पुन्हा बांधीन.