TSK

TSK · आमो 6:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा सर्व शूर पुरुष उठून रात्रभर चालत गेले आणि त्यांनी शौलाचे प्रेत व त्याच्या मुलांची प्रेते बेथ-शानाच्या भिंतीवरून काढून याबेशाला आणले व तेथे ती जाळली.

योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यातील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्याप्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते. पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली.

¶ यास्तव जे तुम्ही यहूदी देशातले मिसर देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराची वचने ऐका; पाहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की, सर्व मिसर देशामध्ये राहणाऱ्या यहूदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही.

इस्राएलाच्या घराण्याला सांग, परमेश्वर देव असे सांगत आहे पाहा! घमंड तुझी ताकत झाली आहे तुझ्या डोळ्यांना जे बरे वाटते ते तुझ्या जीवाच्या वासनेने माझे पवित्रस्थान विटाळले आहे! आणि जी तुझी मुले व ज्या तुझ्या मुली मागे उरलेल्या होत्या त्या तलवारीने खाली पडल्या आहेत.

परमेश्वर, असे म्हणातो, त्या दिवसात मंदिरातील गाणे विलाप होतील. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील, प्रत्येक स्थानांत लोक गुपचूप ती बाहेर टाकून देतील.”