TSK

TSK · दानि 5:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

इस्राएल लोकांनी, याजक, लेवी, बंदिवासातून आलेले यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना आनंदाने केली.

¶ मग त्याने यहूदा आणि यरूशलेमेच्या प्रत्येक ठिकाणी बोलावणे पाठवले. बंदिवासातून आलेल्या समस्त यहूदी लोकांस त्याने यरूशलेमेमध्ये जमायला सांगितले.

¶ त्या लोकांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हे यहूदा वंशाचे होते.

¶ नंतर अर्योकाने दानीएलास लवकर राजासमोर नेऊन म्हटले, “यहूदाच्या बंदीवानात मला एक मनुष्य सापडला आहे जो राज्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल.”

बेलशस्सराने द्राक्षरस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून आणली होती. ह्यासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी हयांना त्यातून द्राक्षरस पिता येईल.

हे राजा सर्वोच्च देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सराला राज्य, महानता, प्रतिष्ठा आणि वैभव दिले.

¶ त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.

¶ यानंतर येशू गालील प्रांतात फिरू लागला, कारण यहूदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते. म्हणून त्यास यहूदीया प्रांतात फिरावेसे वाटले नाही.