TSK

TSK · दानि 8:27

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ नंतर राजाने दानीएलास मोठा सन्मान आणि अद्भुत भेटवस्तू दिल्या. त्यास अवघ्या बाबेलातील परगण्याची सत्ता दिली आणि दानीएल बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा मुख्य प्रशासक झाला.

त्यांच्यावर तीन मुख्यप्रशासक होते. त्यापैकी एक दानीएल होता. या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना हिशोब द्यावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो.

मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही.

मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.