TSK

TSK · अनु 11:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल.

तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा.

¶ म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यांच्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.

मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.