TSK

TSK · अनु 2:24

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ते तेथूनही निघाले आणि आर्णोन नदीत्या पैलतीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम आमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती.

सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांस म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;

“पारसचा राजा कोरेश म्हणतो; स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यहूदातील यरूशलेमेमध्ये मंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरूशलेमेला जाऊ शकता, परमेश्वर देव तुमच्याबरोबर असो.”

¶ मी आपल्या महासामर्थ्याने आणि आपले भूज उभारून पृथ्वी निर्माण केली. मी पृथ्वी व त्यावरील प्राणीसुद्धा निर्माण केले आणि माझ्या दृष्टीने जो कोणी योग्य आहे त्यास मी देतो.

त्याने तुम्हास त्या जागा दिल्या जिथे माणसे राहतात. त्याने तुमच्या आधीन वनपशू आणि आकाशातील पक्षी केले आहेत आणि तुम्हास त्याचा शासक बनविले आहे, तुम्ही त्या पुतळ्याचे सुवर्ण मस्तक आहात.