TSK

TSK · अनु 5:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला.

¶ लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे व पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले.

मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो. दृष्टांताने किंवा कोड्यानी बोलत नाही. तो माझे स्वरूप पाहत असतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरूद्ध बोलताना तुम्हास भीती कशी वाटली नाही?

परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हास आवाज ऐकू आला पण तुम्ही कोणती आकृतीही पाहीली नाही, फक्त वाणी ऐकू आली.

अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे?

पुढे मोशे म्हणाला, ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हास मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वतापाशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिल्या.

इस्राएलात मोशे सारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत झाला नाही. परमेश्वरास मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता.