TSK

TSK · अनु 6:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील,

मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”

मी तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांइतके बहुगुणित करीन आणि हे सर्व देश मी तुझ्या वंशजांना देईन. तुझ्या वंशजांद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.

इस्राएल लोक फार फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली; ते महाशक्तीशाली झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला.

त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.

त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासीयांना कळेल. हे नियम ऐकून ते म्हणतील, खरेच, हे महान राष्ट्र बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.

ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.

आणि येथे आम्हास आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हास दिली.

त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हास देण्यासाठी वचन दिले आहे.

तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.

नीतिमानास सांगा कि त्यांचे भले होईल; कारण ते आपल्या कृतींचे फळ खातील.