TSK

TSK · एस्ते 3:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.

परमेश्वर देव तुम्हास वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.

लोकांच्या आठवणीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता.

राजा अर्तहशश्त यास, आम्ही तुम्हास कळवू इच्छितो की, तुम्ही पाठवून दिलेले यहूदी कैदी येथे यरूशलेमेस आले आहेत. ते बंडखोर नगर बांधत आहे. त्यांनी भिंतीचे काम पूर्ण केले आहे आणि पायाची दुरुस्ती केली आहे.

¶ कृपया तुझा सेवक मोशे याला सांगितलेले वचन तू आठव. त्यास तू म्हणाला होतास, “जर तुम्ही अविश्वासू राहिलात तर मी तुम्हास दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पांगवून टाकीन,

तरी उरलेल्यांचा मी बचाव करेन, देशातून काहींचा बचाव तलवारीपासून होईल, जेव्हा देशातून तुमची पांगापांग होईल.

हे शब्द ऐकून राजा अती खिन्न झाला आणि दानीएलाचा बचाव कसा करावा याचा विचार करू लागला त्यासाठी सुर्यास्तापर्यंत तो खटपट करत राहीला.

यामुळे यहूदी आपसात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कोठे जाईल? हा ग्रीकमधील आपल्या पांगलेल्या यहूदी लोकांस जाऊन त्यांस शिकवील काय?

परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत.

परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे.

¶ येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र,