TSK

TSK · निर्ग 18:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.”

हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.

¶ मोशे इस्राएल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही.

¶ देवाने मोशे व इस्राएल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यांनी याजक इथ्रो याने ऐकले;

¶ मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांस एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.

¶ हे आमच्या देवा, महान, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, आमच्यावर अनेक आपत्ती आल्या त्यांना छोट्या समजू नकोस आणि आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.

हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे.

तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.

तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.

परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,