TSK

TSK · निर्ग 2:15

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याने नगराबाहेरच्या विहिरीजवळ आपले उंट खाली बसवले. ती संध्याकाळ होती, त्या वेळी पाणी काढायला स्त्रिया तेथे येत असत.

एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते.

त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता.

दुसऱ्या मुलाचे नाव एलियेजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने मला मदत केली व मला फारोच्या तलवारीपासून वाचवले.”

¶ अहाब राजाने घडलेली सर्व हकिकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले.

शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.

कूशानचे तंबू संकटात असलेले मी पाहिले, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या.

तेथे याकोबाची विहीर होती. म्हणून प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते.

¶ विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला.