तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे, सर्व नर परमेश्वराचे होत.
TSK
TSK · निर्ग 22:29
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.
¶ तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोऱ्हा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका.
बआल-शालीश येथून एकदा एक मनुष्य आपल्या नव्या पिकातील जवाच्या वीस भाकरी देवाच्या मनुष्यासाठी घेऊन आला. तसेच कोवळी कणसे पोत्यातून घेऊन आला. तो म्हणाला, “हे सर्व या लोकांस खायला दे.”
तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,
¶ मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे, खायला एकही घोंस नाही, पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.
आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहोत.