TSK

TSK · निर्ग 23:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील, आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत ते तुझ्या लोकांस काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;

तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याची कोण हिंम्मत करील? जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल.

इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांस म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.”

मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आता पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन.

शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, ‹“शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?”›