त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय;
TSK
TSK · निर्ग 29:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मग त्या सर्व वस्तू त्यांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वरास अर्पिलेले सुवासिक हव्य होय.
याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.
¶ अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.
¶ आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;
¶ आणि याजकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे वेगळी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्यास क्षमा करील.
परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटता ठेवावा व त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा.
¶ मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल.
¶ मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली;
अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.
याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वरास सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.
जर त्या मनुष्याने त्यास असे म्हटले की, “अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तू घे” तर तो म्हणे असे नाही, “पण तू आताच दे नाही तर मी ते बळजबरीने घेईन.”
परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत; आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;”
तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस. पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे.