TSK

TSK · निर्ग 29:36

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत.

तसेच होमवेदी व होमवेदीच्या सर्व वस्तू आणि गंगाळ व त्याची बैठक या सर्वांना अभिषेक करावा.

¶ मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवासमंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना आभिषेक करुन त्यांना पवित्र केले.

¶ पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.

तू त्याच्या रक्तातले थोडेसे घेऊन वेदीच्या चारी शिंगावर, बैठकीच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपड. अशा रीतीने तू प्रायश्चित करून शुद्ध कर.

आणि त्यांनी ते दिवस समाप्त केल्यावर असे होईल की, आठव्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची शांत्यर्पणे वेदीवर अर्पितील आणि मी तुमचा स्विकार करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षालन होत नाही.