TSK

TSK · निर्ग 3:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता, आणि त्याने त्यास कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.

मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता.

¶ मिसरी लोकांची कृपादृष्टी इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले आणि म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिसरी इस्राएल लोकांस लुटले.

तेव्हा, हे परमेश्वरा, मी तुला विनवणी करतो की, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि या मनुष्यावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.

त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात त्यांच्यावर दया येईल असे केले.

त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले, आणि मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.