उत्प 3:10
TSK
मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.”
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.”
परमेश्वर अहरोनावर इतका संतापला होता की, त्याचा नाश करणार होता. पण मी त्याच्यासाठी प्रार्थना केली.
तुझी नग्नता उघडी होईल, होय, तुझी लज्जा दिसेल. मी सूड घेईल आणि कोणा मनुष्यास सोडणार नाही.
अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जीवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील.
शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा. सनानिवासी बाहेर निघून येत नाही, बेथ-एसलासचा शोक करेल, कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.
‹तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळविली आहे, आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.›