TSK

TSK · निर्ग 32:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस;

मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी.

¶ मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्यास म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांला कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.”

मी पाहिले की तुमचा देव परमेश्वर त्याच्या इच्छेविरूद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही सोन्याच्या वासराची ओतीव मूर्ती केली होती. परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबवून तुम्ही बहकून गेला होता!

तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यामध्ये ते ठेवले, मग सर्व इस्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले.

त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. “त्यांनी त्यास एक तोड सुचवली. त्यानुसार राजा यराबामाने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांस म्हणाला, तुम्हास यरूशलेमेला उपासनेसाठी जायची गरज नाही. हे इस्राएला तुम्हास मिसर देशाबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”

पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलाला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.

आता तुम्ही लोकांनी परमेश्वराचे राज्य म्हणजे दाविदाच्या पुत्राची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुमची सेना मोठी आहे आणि यराबामाने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत.

त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली.

तर मग तुम्ही देवाची तुलना कशाशी कराल? तर त्याची तुलना कोणत्या प्रतिमेशी करणार?

लोक पिशवीतून सोने ओततात आणि चांदी तराजूने तोलतात. ते सोनाराला मोलाने ठेवतात आणि तो त्यांचा देव करतो; ते नतमस्तक होतात आणि उपासना करतात.

शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.

मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली, व तिच्यापुढे ‘यज्ञ करुन’ आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला.

कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले.