TSK

TSK · निर्ग 33:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”

तो त्यास म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी ही विनंतीसुद्धा मान्य करतो. तू उल्लेख केलेल्या नगराचा नाश मी करणार नाही.

परमेश्वराच्या कोपाची मला भीती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले.

‹आणि त्यादिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल.›

¶ आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.