¶ मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;
TSK
TSK · निर्ग 33:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांस सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले.
शौलाचा नातू मफीबोशेथ राजा दावीदाला भेटायला आला. राजा यरूशलेम सोडून गेला तेव्हा पासून तो सुखरुप परतेपर्यंत मफीबोशेथने स्वत:कडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाहीत.
¶ हे ऐकून राजा हिज्कीयाने त्याच्या अंगावरची वस्त्रे फाडली आणि गोणताट घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
¶ जे झाले ते सर्व मर्दखयाला समजले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि गोणताटाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासली. तो बाहेर नगरामध्ये आणि मोठयाने आक्रोश करत आणि दुःखाने रडत निघाला.
¶ जेव्हा त्यांनी दुरून आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा त्यांनी त्यास आळखले नाही, ते मोठ्याने रडले, प्रत्येकाने आपआपला स्वतःचा झगा फाडला आणि हवेत धूळ उडवली आणि स्वतःच्या डोक्यावरही घेतली.
तू मुकाट्याने खेद व्यक्त कर मृतांसाठी दुःख व्यक्त करु नको, आपल्या डोक्यात फेटा राहू दे, व पायात जोडा घाल आपले तोंड झाकू नको दुःखाच्या समयी पत्नीच्या मुत्युनंतर जे पुरुष अन्न पाठवतात ते खाऊ नको.”
कारण समुद्रातले सर्व प्रमुख आपल्या सिंहासनावरून खाली उतरतील आणि आपले झगे बाजूला काढून ठेवतील आणि आपले रंगीबेरंगी वस्त्रे काढून टाकतील. ते स्वतःला भीतीच्या वस्त्राने आच्छादतील आणि भीतीने जमिनीवर बसतील व वारंवार कांपतील आणि तुझ्याविषयी भयचकीत होतील.
¶ निनवेच्या राजाला ही बातमी समजली, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून तो गोणताट नेसून राखेत बसला.
“याजकांना आणि या देशातील इतर लोकांस सांग की तुम्ही सत्तर वर्षे प्रत्येक वर्षांच्या पाचव्या आणि सातव्या महिन्यात उपवास केला व शोक प्रकट केला. पण हा उपवास खरोखरच माझ्यासाठी होता का?