निर्ग 25:2
TSK
“इस्राएल लोकांस माझ्यासाठी अर्पणे आणायला सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
“इस्राएल लोकांस माझ्यासाठी अर्पणे आणायला सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.
माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
¶ येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते.
प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो.