TSK

TSK · निर्ग 6:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला.

मोशेने प्रत्येक वंशातून एक हजार असे बारा हजार लोकांस लढाईवर पाठवले. त्यांना आणि त्यांच्याबरोबर याजक एलाजाराचा मुलगा फिनहासास पवित्र पात्रे व इशारा देण्यासाठी रणशिंगे त्यांच्या हवाली करून पाठवले.

यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास ह्याने रऊबेन वंश व गाद वंश, व मनश्शे वंश यांना सांगितले, “आज आम्हांला कळले की, परमेश्वर आमच्यामध्ये आहे; कारण की तुम्ही परमेश्वराचा काही गुन्हा केला नाही; येणेकरून तुम्ही इस्राएल लोकांस परमेश्वराच्या हातातून सोडवले आहे.”

आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसात त्याची सेवा करत होता. “आम्ही आपला बंधू बन्यामीन याच्या लोकांविरुद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे?” तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, “तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.”

पण फिनहास मध्यस्थी उठला; आणि मरी बंद झाली.