TSK

TSK · निर्ग 9:18

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरुवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”

ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.

तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार. यामध्ये मला यश आले नाहीतर देव माझे तसेच व त्याहूनही अधीक करो.”

¶ अलीशा म्हणाला, परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर म्हणतो या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल. शिवाय ते स्वस्तही असेल. शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल.

मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो.