TSK

TSK · यहे 21:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

शत्रू म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.

परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.

मी स्वत:शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.

तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;

¶ जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते. नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, यज्ञ करणारा आणि यज्ञ न करणारा, या सर्वांची सारखीच गती होते. चांगला मनुष्य पापी मनुष्यासारखाच मरेल. शपथ वाहणाऱ्याची, तशीच शपथ वाहण्यास घाबरतो त्याची दशा सारखीच होते.

ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.

पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”

परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हास शिक्षा करीन. आणि मी तिच्या वनात अग्नी पेटवीन तेव्हा ते सभोवतीचे सर्वकाही जाळून टाकेल.”

“हे गर्विष्ठा, पाहा, मी तुझ्याविरूद्ध आहे” असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण हे गर्विष्ठा, तुझा दिवस आला आहे, मी तुला शिक्षा करण्याची वेळ आली आहे.

परमेश्वर असे म्हणतो, “हे नाश करणाऱ्या पर्वता तू जो दुसऱ्यांचा नाश करतो, मी तुझ्याविरूद्ध आहे, सर्व पृथ्वीचा नाश करतो. मी आपल्या हाताने तुला तडाखा देईल आणि तुला कड्यांवरुन खाली लोटून देईन. मग बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुला करीन.

घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील.

जर मी देशा विरुध्द तलवार चालवीली आणि म्हणालो, देशातील दोन्ही मनुष्य आणि पशू नष्ट करीन.

मानवाच्या मुला, भाकीत कर आणि म्हण असे परमेश्वर देव सांगत आहे, तलवारीला धार लावा आणि त्यास चकाकीत करा.

¶ यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहेः या रक्तपाती शहराचा निषेध असो, मी जळणासाठी लाकडाचा मोठा साठा करीन.

परमेश्वरास शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल, नाहीतर तो अग्नीसारखा योसेफाच्या घरावर पडेल आणि ते भस्मसात होऊन जाईल आणि त्यास विझवायला बेथेलमधे कोणी नसणार.

¶ पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तिचे रथ जाळून त्यांचा धूर करीन; आणि तलवार तुझ्या तरुण सिंहास खाऊन टाकील. मी तुझे भक्ष्य तुझ्या देशातून नाहीसे करीन, आणि तुझ्या दूतांचा आवाज ऐकण्यात येणार नाही.

अहो कूशींनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.