TSK

TSK · एज्रा 3:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्यांनी त्या जागेचे नाव बोखीम असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले.

मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांस उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.

¶ या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला, सर्वजण अतिशय आनंदात होते. कारण देवाने सर्वांना आनंदीत केले होते. स्त्रिया आणि बालकेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांसही यरूशलेम मधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.

हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.

“हे उंच पर्वता तू कोण आहेस? तू जरुब्बाबेलासमोर सपाट प्रदेश होशील, तो त्यावर ‘अनुग्रह! अनुग्रह!’ असा गजर करीत शिखर पुढे आणील.”