TSK

TSK · एज्रा 3:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.

¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.

¶ आणखी तू त्यांना सांग, अग्नीतून केलेले अर्पण त्यांनी परमेश्वरास अर्पावे ते हे आहेः त्यांनी नेहमी होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन निर्दोष नर कोकरे.

तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.

¶ यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तीएल,

मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात.

जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणे.

¶ याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढीलप्रमाणे, योसादाकाचा मुलगा येशूवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब, गदल्या.

हारीमच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया,

¶ शल्तीएलाचा पुत्र जरुब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते जे याजक आणि लेवी आले ते हे आहेतः सराया, यिर्मया, एज्रा,

त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.

¶ मग शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा मुलगा यहोशवा व उरलेले सर्व लोक यांनी, आपला देव परमेश्वर याची वाणी आणि हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली, कारण आपला देव परमेश्वर ह्याने त्यास पाठवले होते आणि लोक परमेश्वराच्या मुखाचे भय धरू लागले.

यहूदाचा राज्यपाल आणि शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा मुलगा यहोशवा आणि उरलेल्या लोकांशी तू बोल. म्हण,

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्यादिवशी हे शल्तीएलाच्या मुला, जरुब्बाबेला, माझ्या सेवकाप्रमाणे मी तुला घेईन, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला मुद्रांकित अंगठीप्रमाणे करीन, कारण मी तुला निवडले आहे! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका! ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील.

त्या सोन्या-चांदीपासून मुकुट घडव. तो यहोसादाकाचा मुलगा यहोशवा मुख्ययाजक याच्या डोक्यावर ठेव.

योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा, रेशा जरूब्बाबेलाचा, जरूब्बाबेल शल्तीएलाचा, शल्तीएल नेरीचा,