TSK

TSK · एज्रा 3:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तर आता माझ्यासाठी तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. तुम्हास माहित आहे की आमचे लोक तुमच्या सीदोनी लोकांइतके कुशल नाहीत.”

मग लोकही परमेश्वराच्या मंदिरात आल्यावर पेटीतच पैसे टाकत. राजाचा चिटणीस आणि मुख्य याजक अधून मधून येत आणि पेटीत बरेच पैसे साठलेले दिसले की ते पैसे काढून घेत. थैल्यांमध्ये भरुन ते मोजत.

लोक परमेश्वराच्या मंदिरासाठी पैसे देत. पण ते चांदीची उपकरणी, कात्र्या, वाडगे, कर्णे, सोन्या-चांदीची तबके त्या पैशातून करण्यात आले नव्हते,

लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षरस आणि वीस हजार बुधले तेल.”

राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड, पितळ या धातूचे काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले.

“पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरूशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे.

मोठ्या दगडांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा.

परंतु योना परमेश्वराच्या सान्निध्यापासून तार्शीश शहरास दूर पळून जायला निघाला, आणि याफो येथे गेला, तेव्हा तार्शीसास जाणारे एक जहाज त्यास सापडले; मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सान्निध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तार्शिशास जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला.

तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या मनुष्यास घेऊ नये, शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात.