तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.”
TSK
TSK · एज्रा 9:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल; त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्यामागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुध्दीने त्यांच्या नादी लावतील.
¶ जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल.
कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.
तेव्हा गिलाद देशात रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश त्याच्याकडे येऊन त्यांनी येऊन असे सांगितले,
त्यावेळी एलाम वंशातल्या यहीएलाचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, “आपण देवाविरूद्ध अपराध केला आहे आणि दुसऱ्या देशातील परक्या स्त्रियांसोबत राहत आहो. तरी आता याविषयी इस्राएलाला अजून आशा आहे.
वरील सर्वांनी परराष्ट्रीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना आपल्या बायकांकडून संतती झाली होती.
यहूदातील पुढाऱ्यांना मी विरोध केला त्यांना मी म्हणालो, “तुम्ही फार वाईट गोष्ट करून शब्बाथाला अपवित्र करीत आहात.
¶ योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा पुत्र, योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटचा जावई होता. यासाठी त्यास मी माझ्यासमोरून हाकून लावले.
यहूदाने विश्वासघात केला आणि यरूशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहूदाने परमेश्वरास प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे.
कारण, विश्वास न ठेवणारा पती पत्नीमुळे पवित्र होतो आणि विश्वास न ठेवणारी पत्नी पतीमुळे पवित्र होते. नाही तर तुमची मुले अशुद्ध असती पण ती आता पवित्र आहेत.