तेव्हा त्यास स्वप्न पडले आणि त्याने पाहिले, एक शिडी पृथ्वीवर उभी आहे. तिचे टोक वर स्वर्गापर्यंत पोहचलेले आहे आणि देवाचे दूत तिच्यावरून चढत व उतरत आहेत.
TSK
TSK · उत्प 20:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.
¶ साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता.
आता माझ्याकडे एक गुप्त निरोप आला, आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.
देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो.
त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली.
¶ योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, “अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.”
देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.