TSK

TSK · उत्प 24:27

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तो म्हणाला, “शेमाचा देव परमेश्वर धन्यवादित असो. कनान त्याचा सेवक होवो.

परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला.

¶ नंतर तो म्हणाला, “हे परमेश्वरा, तू माझा धनी अब्राहाम याचा देव आहेस, आज मला यश मिळण्यास मदत कर आणि तू प्रामाणिकपणाने करार पाळणारा आहेस हे माझा धनी अब्राहाम ह्याला दाखवून दे.

आणि आज मी या झऱ्याजवळ आलो आणि म्हणालो, ‘हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, कृपा करून जर खरोखर माझ्या प्रवासाचा हेतू यशस्वी करीत असलास तर,

तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्यास मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत.

¶ काही दिवसानी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्याने त्यांची कष्टाची कामे पहिली. कोणी एक मिसरी आपल्या इब्री मनुष्यास मारत असताना त्याने पाहिले.

इथ्रो म्हणाला, “ज्याने तुम्हास मिसऱ्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले ज्याने आपल्या प्रजेला मिसऱ्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय.

तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो.

नाबाल मेला असे दावीदाने ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादीत असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे.” मग दावीदाने अबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली पत्नी करण्याविषयीची गोष्ट काढली.

¶ त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.”

परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो, तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.

कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.

मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे.

पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की, तू याकोबाला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासूपणा देशील.

कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली.

¶ आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.