TSK

TSK · उत्प 31:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे;

त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा बाप अब्राहाम याचा देव आहे. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि माझा सेवक अब्राहाम याच्यासाठी मी तुला आशीर्वादित करीन व तुझे वंशज बहुतपट करीन.”

पाहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता, आणि तो म्हणाला, “मी परमेश्वर, तुझा बाप अब्राहाम याचा देव व इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस, ती मी तुला व तुझ्या वंशजांना देईन.

मग याकोबाने शपथ वाहून नवस केला, तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यामध्ये माझे रक्षण करील, आणि मला खावयास अन्न व घालण्यास वस्त्र देईल,

बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’”

माझ्यापाशी पुष्कळ गाई-गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप आणि दास व दासी आहेत. आपली कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून मी आपल्या धन्याला हा निरोप पाठवीत आहे.’”

तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्यास मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत.

रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”

देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.

जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.

¶ आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”