मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.
TSK
TSK · उत्प 31:55
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ इसहाकाने याकोबाला बोलावून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास आज्ञा दिली, “तू कनानी मुलगी पत्नी करून घेऊ नको.
तू मला माझ्या नातवांचा व माझ्या मुलींचा निरोप घेण्याची किंवा त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहे.
एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.
ज्याला देवाने शाप दिला नाही त्यास मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्यास मी कशी धमकी देऊ?
नंतर बलाम उठला आणि गेला. तो आपल्या घरी परत गेला आणि बालाकही आपल्या वाटेने गेला.
परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करून सोडील.
खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.
ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.”