तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”
TSK
TSK · उत्प 32:6
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तो म्हणाला, “जर एसावाने एका टोळीवर हल्ला करून मार दिला तर दुसरी टोळी निसटून जाईल व वाचेल.”
¶ याकोबाने वर पाहिले आणि पाहा, त्यास एसाव येताना दिसला आणि त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली.
तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या मनुष्यातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवतो.” परंतु याकोब म्हणाला, “तसे कशाला? माझ्या धन्याची आधीच माझ्यावर पुरेशी कृपा झालेली आहे.”
लोक म्हणाले, “आपण आम्हांला वाचवले आहे, म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हांला आनंद आहे.”
¶ मग ती म्हणाली, “माझ्या प्रभू, आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”
जणू काय एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला आणि अस्वलाने त्यास गाठले, अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला आणि त्यास साप चावाला.