TSK

TSK · उत्प 4:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे.

परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.

जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?

मग देव योनाला म्हणाला, “त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.”

‹मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’›

¶ येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले.