तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.”
TSK
TSK · उत्प 9:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका.
नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्यास तो खायला हरकत नाही किंवा त्यास तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका.
तेव्हा कोणी शौलास सांगितले की, “पाहा लोक रक्तासह मांस खाऊन परमेश्वराच्या विरूद्ध पाप करत आहेत.” त्याने म्हटले, “तुम्ही अविश्वासूपणे कृत्ये करत आहात. मोठा दगड लोटून येथे माझ्याकडे आणा.”
म्हणून तू त्यांना सांग की प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही आपल्या मूर्तीकडे डोळे लावता, तुम्ही लोकांचे रक्त पाडता. तर मग तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का?
म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य वाटले की,
तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही.